काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. यावेळी त्यांना मी देशातील विमानसेवा बंद करण्याची विनंती केली आहे. आजपर्यंत ज्यांनी डॉक्टरांवर हात उचलले त्यांना आता डॉक्टरांचं महत्त्व समजलं असेल. आज मंदिरं बंद आहेत, पण रूग्णालये सुरू आहेत, असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. राज्यातील करोनाच्या पाश्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.